Top 10 Credit Cards | 2023 मधील टॉप 10 क्रेडिट कार्ड तुम्हाला माहित आहेत का ?

क्रेडीट कार्ड्स जवळ बाळगणे हे सुद्धा एक स्टेटस सिम्बॉल आहे. जवळपास सर्वच  क्रेडिट कार्ड वापरताना दिसून येतात. परंतु खूप जणांना वापरत असलेल्या क्रेडिट कार्ड चे फायदे किंवा तोटे माहित नसतात. नमस्कार मंडळी, काय म्हणता च्या ह्या ब्लॉग मध्ये आपण क्रेडिट कार्ड विषयी सर्व जाणून घेणार आहोत.

Credit Card काय असते ?

क्रेडिट कार्ड हे एक प्लास्टिक कार्ड असते आणि दिसायला डेबिट कार्ड सारखे असते. परंतु क्रेडिट कार्ड च्या मदतीने आपण तात्काळ बँक कडून उधार पैसे घेवू शकतो आणि ठराविक काळापर्यंत ते बिनव्याजी वापरू शकतो. तसेच क्रेडिट कार्ड ने आपण शॉपिंग करू शकतो किंवा घरातील सर्व बिल सुद्धा भरू शकतो.

क्रेडिट कार्ड्स किती प्रकारचे असतात ?

पेमेंट ट्रान्स्फर च्या आधारे बघितलं तर मुख्यत: दोन प्रकारचे असतात. पाहिलं मास्तर कार्ड आणि दुसर विजा क्रेडिट कार्ड. तसेच कस्टमर फायद्याच्या आधारे कॅशबॅक क्रेडिट कार्ड आणि रिवार्ड क्रेडिट कार्ड.

तसेच फ्युल क्रेडिट कार्ड, शॉपिंग क्रेडिट कार्ड, शून्य वर्षीक शुल्क क्रेडिट कार्ड, प्रीमियम क्रेडिट कार्ड यासारखे खूप प्रकार चे क्रेडिट कार्ड भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

क्रेडिट कार्ड चे फायदे ?

  • क्रेडिट कार्ड च्या वापरामुळे आपला क्रेडिट स्कोअर जलद वाढतो.
  • कॅशबॅक आणि Reward Points मुळे आपण बचत करू शकतो.
  • बँक अकाऊंट मध्ये शून्य रुपये असतांना सुद्धा शॉपिंग करू शकतो.
  • क्रेडिट कार्ड मुळे  मोठ्या खरेदीवर एकदम पेमेंट करण्यापेक्षा EMI ऑप्शन ने पेमेंट करू शकतो .
  • बँक कडून उधार घेवून 30 ते 45 दिवस बिनव्याजी पैसे वापरू शकतो.

क्रेडिट कार्ड चे तोटे ?

  • क्रेडिट कार्ड ने पैसे काढले आणि वेळेत भरले नाहीत तर खूप व्याज भरावे लागते.
  • वेळेत क्रेडिट कार्ड चे हप्ते भरले नाहीत तर सिबिल स्कोअर कमी होवू शकतो.

क्रेडिट कार्ड कोणाला मिळते ?

जो नोकरदार आहे , किंवा ज्याचा बँक शी चांगला व्यवहार आहे त्यांना लगेच मिळते.

२०२३ मधील सर्वात स्वस्त क्रेडिट कार्ड कोणते आहे ?

सर्वात स्वस्त क्रेडिट कार्ड तेच ज्यावर वार्षिक शुल्क शून्य असते. HDFC Visa Primium Credit Card चे वार्षिक शुल्क शून्य आहे.

जगातलं सर्वात महाग क्रेडिट कार्ड कोणत आहे ?

अमेरिकन एक्सप्रेस सेंचूरियन  क्रेडिट कार्ड हे जगातील सर्वात महाग कार्ड आहे. हे वर्ड फक्त त्यांनाच मिळते ज्यांचा ऑनलाईन शॉपिंग खर्च महिना ८२ लाख रुपये आहे. हे क्रेडीट कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला इन्वीटेशन ची गरज असते. आणि जो आधीपासून हे कार्ड वापरतोय तोच इन्वीटेशन देवू शकतो. थोडक्यात हे एक सिक्रेट कार्ड आहे. Black Credit Card

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :