E Shram Card |  तुमच्या मोबाईलवर ई-श्रम कार्ड काढा, मिळेल दोन लाख रुपयापर्यंत फायदा

ऑनलाईन ई-श्रम कार्ड काढण्याची नवीन प्रोसेस जाणून घ्या

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी e-shram सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटच्या उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.
  • या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चामध्ये तुम्हाला self registration टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षर जशीच्या तशी टाकायची आहेत.
  • त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सागायचं आहे. या दोन्ही पर्यायापुढे no या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ऑटीपी वर क्लिक करायचं आहे.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. बरोबरची टिक ओटीपी पर्याय म्हणून तशीच ठेवायची आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे.
  • त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील बॉक्स वर टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.
  • तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकून तुम्हाला validate वर क्लिक करायचं आहे.
  • मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डीटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. खालील असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या बॉक्स मध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर continue to other details वर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामध्ये वडिलांचं नाव, लग्नाचं स्टेट्स आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. जर तुम्ही अपंग असाल तर yes किंवा no वर टिक करा.
  • त्यानंतर नॉमिनीचे डीटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीच नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतच नात निवडायच आहे. व त्यानंतर save and continue वर जाऊन तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या पूर्ण पत्त्यासंदर्भात तुम्हाला माहिती भरायची आहे. यामध्ये सुरुवातीला जिल्हा आणि राज्य निवडायचा आहे. त्यानंतर सध्याच्या पत्ता सांगायचा आहे. यामध्ये शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय म्हणून तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.
  •  त्यानंतर तुम्ही किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. सगळी माहिती टाकून झाल्या नंतर मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य, घर क्रमांक आणि पिनकोड टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला save and continue वर क्लिक करायचं आहे.
  • आता शैक्षणिक माहिती भरायची आहे. इथे सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ही माहिती भरावी लागेल व तो पर्याय निवडावा लागणार आहे. आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडानिवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर जाऊन क्लिक करा.
  • पुढे ऑक्युपेशन आणि स्किल या पेजवर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही सध्या काय व्यवसाय करता ते सागायचं आहे आणि मग किती वर्षाचा अनुभव आहे तो आकडा निवडायचा आहे. सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये अजून दुसरा व्यवसाय करत असाल तर ते टाकायचं आहे. व नंतर  save and continue वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डीटेल्स टाकायचे आहेत.
  • यात बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो पुन्हा टाकून कन्मफ करायचा आहे. पुढे खातेदाराचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड, बँकेचं नाव आणि शाखेच नाव टाकायचं आहे. save and continue वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली ती एकाच ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. ती वाचून घ्यायची आहे. आणि शेवटी मी भरलेली सगळी माहिती खरी आहे, आशा आशयाच्या डिक्लेरेशनवर टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचं ई-श्रम स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवरील उजवीकडच्या Download UAN कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमचं ई-श्रम कार्ड डाऊनलोड होईल.
  • या पेजच्या सर्वात खाली असलेल्या complete registration वर क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :