वडिलोपर्जित मालमत्तेमध्ये मुलीचा हक्क किती असतो येथे पहा
Land Record: वडिलोपर्जित मालमत्ता मध्ये मुलीचा हक्क किती असतो आणि कायदा काय सांगतो? याच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. कायद्यानुसार मुलीच्या वडिलोपर्जित जमिनीवर हक्क असतो का? हे आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे. Land Record
हिंदू संपत्ती कायद्यात दोन भाग आहेत. दोन भाग म्हणजे एक वडिलोपर्जित संपत्ती आणि दुसरी म्हणजे स्वअर्जित संपत्ती. सुरुवातीच्या काळामध्ये वडिलोपर्जित संपत्तीवर फक्त मुलाचा हक्क होता. मात्र, हिंदू वारस कायदा (दुरुस्तीनुसार) 2005 कायद्यानुसार वडिलोपर्जित संपत्तीवर मुलांन इतकाच मुलीचा देखील अधिकार आहे. वडील आपल्या मनाप्रमाणे ही संपत्ती देऊ करू शकत नाहीत. तसेच कायद्यानुसार मुलींना संपत्ती देण्यास नकारही काही देऊ शकत नाही. Land Record
वडिलांनी जर स्वतः सर्व संपत्ती कमवली असेल तर मुलीचा त्या संपत्ती हक्क असतो. वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमिन खरेदी केली असेल किंवा कोणतीही गोष्ट खरेदी केली असेल तर संपत्ती कुणाला द्यायची याचा संपूर्ण अधिकार हा वडिलांना आहे. त्यामुळे संपत्तीत वडिलांना मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही.
वडिलांनी जीवंतपणे आपली संपत्ती म्हणजेच संपत्तीचे इच्छापत्र कोणाला द्यायचे हे तयार केलेले नाहीत, आणि अशा मध्येच त्यांचा मृत्यू झाला, तर कायद्यानुसार त्यांच्या सर्व वारसदरांचा या संपत्तीवर समान अधिकार असतो. म्हणजेच अशा परीस्थितीत मुलीचा या संपत्तीवर मुला इतकाच अधिकार असतो. Land Record
बऱ्याच वर्षापूर्वी मुलींना केवळ कुटुंबाचा एक सदस्य म्हणून ओळखले जात होते. मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिच्या माहेरची लोक तिला त्यांच्या घरातील सदस्य मनात नव्हते. मात्र, 2005 च्या दुरुस्त केलेल्या कायद्यानुसार आता मुलींना वडिलोपर्जित संपत्तीत समान वारस मानला जातो. मुलींचं लग्न झालं तरी मुलीच्या वडिलांच्या संपत्तीवर अधिकार कसलाही कमी होत नाही.
2005 हिंदू वारसा कायद्यानुसार, मुलीच्या जन्म हा कायदा लागू होण्याआधी झालेला असू अथवा नंतर याने काही फरक पडत नाही. म्हणजेच जन्म हा दुरुस्ती कायदा लागण्या अगोदर झाला असेल आणि तिच्या वडिलांचा मृत्यू अगोदरच झाला असेल तर या दुरुस्त केलेल्या कायद्यानुसार मुलीचा वाटा हा मुलाच्या वाटा एवढाच आहे. म्हणजेच दोघांचाही वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार आहे. Land Record