आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) पहा असे…
- गुगलवरती aapleabhilekh.mahabhumi.gov.in असे सर्च करा.
- त्या नंतर तुमच्या समोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
- या पेजवरील ई- रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर आल्यावरती “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
- त्यामध्ये उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून तुम्हाला जी पाहिजे ती भाषा निवडा.
- त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व “मदत’ हे ऑप्शन दिसून येतील. तुम्ही जर वेबसाईटवरती नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून साईटवरती जाऊ शकता.
- नोंदणी केली नसेल तर “नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा. त्या नंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा. जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, तुमचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा.
- त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल आयडी, जन्म तारीख ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्या विषयीचे रकण्यात माहिती भरा.
- या नंतर लॉग इन आयडी तयार करा. वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करावे. आणि निर्देशानुसार पासवर्ड टाका.
- त्या नंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या.
- त्या नंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चोकटीत टाईप करा. नंतर शेवटी सबमिट बटण दाबा.
- त्या नंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज तुम्हाला येईल. या वरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.
- आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्डचा वापरून परत करून लॉग इन करा.
असा पाहा फेरफार उतारा…
- वेबसाईटवरती सात जिल्ह्यां पैकी एक जिल्हा निवडा. नंतर तुमचा तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत.
- त्या नंतर गट क्रमांक टाका व “शोध” या पर्यायावरती क्लिक करा.
- यानंतर शोध निकाल या पेजवरती तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराबद्दलची माहिती दिसते.
- फेरफाराचं वर्ष, क्रमांक हा दिलेला असतो. त्यावरती क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार तुम्ही पाहु शकता.
- त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावरती क्लिक करा.
- त्या नंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याच्या खाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावरती क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ असे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- “तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ तिथे असे लिहलेले दिसेल..
- त्या समोरील “फाइल पाहा’ या पर्यायावरती क्लिक केल्या नंतर फेरफार पत्रक ओपन होईल.
👉👉 येथे क्लिक करून सातबारा किंवा फेरफार पहा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-