सध्या भारतात डिजिटल क्रांतीमुळे शासनाच्या सर्वच विभागात सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचा आणि शासकिय अधिकाऱ्यांचा वेळ देखील वाचतो आणि काम वेळेत होते. मग या ऑनलाईन प्रक्रियेपासून परिवहन विभाग कसे वेगळे राहिल. अगदी अपडेटेड तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुक विभागाने M Parivahan ॲप तयार केले आहे. वाहनाची कागदपत्रे सांभाळणे, किंवा एखादे जुने वाहन विकत घेताना संबंधीत कागदपत्रे योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी याआधी विविध अडचणी येत असत. परंतु आता तसे नाही. M Parivahan ॲपच्या माध्यमातून आपण वाहनासंबंधीत आणि वाहतुक पवान्यांसंदर्भातील सर्व माहिती मिळवू शकतो. चला तर मग आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण अधिक माहिती मिळवूया. Traffic Police
काय आहे एम-परिवहन अॅप? M Parivahan App
- एम-परिवहन M Parivahan अॅप परिवहन विभागाकडून तयार करण्यात आले आहे.
- या अॅपमध्ये एखाद्याने दुचाकी, चार चाकी वाहनांचा नंबर तपासल्यास वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळते.
- तुम्हाला हवा तो वाहन परवाना नंबर सर्च करुन त्याबद्दल आणि त्या वाहन मालकाबद्दल माहिती मिळवता येईल.
- तसेच नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवायचा हे देखील या अॅपच्या मदतीने समजू शकेल.
- एम परिवहनचा वापर कसा कराल? तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. Traffic Police
- .डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात शासनाने डिजिटल वाहन परवान्याची सुविधा या आधीच सुरु केलेली आहे.
- आता यानंतर संपूर्ण देशभरात डिजिटल वाहन परवाने देण्याची सुविधेची अंमलबजावणी होईल असे वाटते. Traffic Police
M Parivahan App कसे डाऊनलोड करायचे.
- तुमच्या मोबाईलमधील play store मध्ये जाऊन M Parivahan App असे टाईप करा.
- पहिला पर्याय येईल ते ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
- अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. Virtual RC आणि Virtual DL यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल,
- Search पर्याय निवडून त्यात तुमचा वाहन नंबर टाईप करा. तुम्हाला तुमचा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. M Parivahan App
M Parivahan ॲपमधून कोणकोणती माहिती आपल्याला मिळू शकेल
- एखाद्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे हे वाहनाची क्रमांक टाकून समजू शकेल.
- वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का याची देखील माहिती M Parivahan ॲपमध्ये समजू शकणार आहे.
- वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण ही देखील आपल्याला समजू शकेल. Traffic Police
M Parivahan app चे फायदे
- वाहनांचे कागदपत्र आणि वाहन चालक परवाना यावरुन ट्रॅफिक पोलिस आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होताना दिसून येतात. वाहनचालक गाडीचे कागदपत्र घरी विसरल्यास अशावेळी पोलिसांनी त्याला पकडल्यास दंड भरावा लागतो. परंतु आता M Parivahan ॲपच्या माध्यमातून तुमच्या तुम्ही तुमच्या वाहनाचे डिजिटल कागदपत्रे पोलिसांना दाखवता येतील.
- जुनी गाडी विकत घेताना त्या फसवणूक टाळण्यासाठी या अॅपच्या मदतीने तुम्ही त्या गाडीचा सर्व माहिती मिळवू शकता. तसेच जुन्या गाडी मालकाची देखील संपूर्ण माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळविणे सोपे झाले आहे.
- आता काही दिवसांना डिजिटल पद्धतीने वाहन परवाना देखील मिळण्याची सुविधा याच अॅपच्या माध्यमातून सुरु होणार आहे. Traffic Police
- तुम्ही वापरत असलेल्या गाडीवर ट्रॅफिक विभागाचे किती चालान बाकी आहेत ही देखील माहिती या M Parivahan App च्या मदतीने समजू शकणार आहे.
- तुमची गाडी नो पार्किंग मधून टो करण्यात आली असेल तर ती कोणत्या ट्रॅफिक पोलिस चौकीवर नेण्यात आली ही देखील माहिती या M Parivahan App मध्ये नागरिकांना समजू शकणार आहे. Traffic Police