Tech Tips: मोबाईलचा इंटरनेट स्पीड वाढविण्यासाठी ‘या’ सेटिंग्ज करा, मग बघा जादू

Tech Tips: स्मार्टफोन जितका महत्वाचा आहे तितकेच महत्त्व इंटरनेटचे आहे. इंटरनेट असेल आणि त्याचा इंटरनेट स्पीड स्लो असेल, तर काहीही नसल्यापेक्षा हा वाईट अनुभव आहे. म्हणजेच आपण इंटरनेटचे रिचार्ज केले पण इंटरनेट स्पीड कमी असल्यामुळे वापरचं करता येत नाही. 

ॲन्ड्राइड स्मार्टफोन आल्यापासून इंटरनेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. ज्याप्रमाणे फोन चार्ज करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मोबाईल मध्ये इंटरनेट असणं आवश्यक आहे. इंटरनेट ही लोकांची गरज बनली आहे. अनेक कामे घरबसल्या इंटरनेटवर होतात. अशा परिस्थितीत स्लो इंटरनेटमुळे तुमची अनेक कामे अडकतील. 

आता जवळपास प्रत्येक काम इंटरनेटशिवाय पूर्ण होत नाही. आजच्या काळात प्रत्येकालाच इंटरनेटची गरज आहे. इंटरनेट शिवाय स्मार्टफोनला अर्थ नाही. परंतु, इंटरनेट असले तरी ते व्यवस्थित चालणं आवश्यक आहे. त्याला स्पीड असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला इंटरनेट वापरता येईल.

स्लो इंटरनेट स्पीड होण्याची अनेक कारणे आहेत. जसे की, खराब नेटवर्क किंवा कमकुवत सिग्नल किंवा फोनची चुकीची सेटिंग अशी अनेक कारणे असतात. पण काही गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड नक्की वाढवू शकता. (how to increase internet speed in mobile)

जर तुम्ही देखील स्लो इंटरनेट सारख्या समस्येने त्रस्त असाल तर काही युक्त्या फॉलो करून तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड सुधारू शकता. 2G, 3G, 4G आणि 5G नेटवर्कवरील लोकांना पूर्वीपेक्षा चांगला इंटरनेट स्पीड मिळतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या फोनमध्ये स्लो इंटरनेट चालू असेल तर काही सेटिंग करावी लागतील. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

स्लो इंटरनेटची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी स्लो इंटरनेटचे कारण कमकुवत कनेक्शन असते. अनेक वेळा टेलिकॉम ऑपरेटरची चूक आहे वाटतं, ज्यामुळे नेटवर्कमध्ये सतत समस्या येत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याची अनेक कारणे असू शकतात.

या सेटिंग करा इंटरनेट स्पीड वाढेल
1) Airplane Mode & Restart : जर नेटवर्क योग्यरित्या येत नसेल तर तुम्ही काही मिनिटांसाठी ते एरोप्लेन मोडवर ठेवू शकता आणि नंतर ते बंद करू शकता. बहुतेक प्रकरणांमध्ये, जेव्हा फ्लाइट मोड चालू असतो तेव्हा मोबाइल डेटा नेटवर्क योग्यरित्या कार्य करतो.
2) सिम कार्ड काढून परत टाका : तुम्ही फिजिकल सिम कार्ड वापरत असल्यास, ते फोनमधून काढून टाका आणि नंतर काही वेळाने परत ठेवा. यामुळे नेटचा स्पीड वाढेल.
3) नेटवर्क स्विच : तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल तर, सेटिंग्जमध्ये उपलब्ध असलेले सर्वोत्तम नेटवर्क निवडा. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. आयफोन वापरकर्त्यांना सर्वप्रथम सेटिंगमध्ये जावं लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल डेटावर टॅप करावं लागेल. त्यानंतर ‘Allow mobile data switching’ पर्यायावर क्लिक करा.
4) अँड्रॉइड वापरकर्त्यांना प्रथम सेटिंगमध्ये जावं लागेल, त्यानंतर त्यांना मोबाइल नेटवर्क निवडावं लागेल. आता सिम मॅनेजमेंटवर जा आणि कॉल दरम्यान स्विच डेटा कनेक्शन पर्यायावर क्लिक करा.
5) मोबाईल नेटवर्क लिमिट (Data Limit) : अनेक वेळा असं घडतं की तुमचा मोबाइल डेटा खूप जास्त वापरला जातो. अनेक रिचार्ज प्लॅन रोजच्या डेटा मर्यादेसह येतात, जे वापरामुळे लवकर संपतात. अशा परिस्थितीत तुमचा डेटा संपला नाही ना हे तुम्ही तपासणे महत्त्वाचं आहे. ही देखील सेटिंग एकदा चेक करून घ्या.


6) इंटरनेट स्पीड कमी असण्याचे कारण मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट न केल्यामुळे देखील कमी असतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन अपडेट आहे, की नाही एकदा चेक करावा. स्मार्टफोन नवीन सॉफ्टवेअर अपडेट वर ठेवा.

अशा काही सेटिंग व काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड नक्की वाढेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल व महत्वाची वाटत असेल तर पुढे मित्र व परिवार मध्ये शेअर करा.

Leave a Comment