Toll Plaza | जाणून घ्या टोल पावतीमुळे होणारे फायदे
१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जात असताना जर का तुमची गाडी अचानक मध्येच बंद पडली तर, तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.
२. जर का एक्सप्रेस हायवे वर तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर अश्या वेळी तुम्हाला तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी ही टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, शक्य झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईडला लावावी. आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबरवर एक फोन करावा. दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल. आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे तुम्हाला मोफत मिळेल. किंवा गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदता मिळवता येऊ शकते.
३. जरी तुमच्या गाडीचा अपघात झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.
४. तुम्ही गाडीतून प्रवास करता असताना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक होऊ शकतं, अश्या वेळेस तुमच्या पर्यंत अँम्ब्युलन्स पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.
५. टोल रस्त्यावर पोलिसांची गस्त सुनिश्चित केली जाते. नियमित अंतराने पेट्रोलिंग. प्रत्येक ठराविक अंतरावर वेगवेगळी पथके गस्त घालण्यासाठी हजर असतात जेणे करून कुठेही अपघात झाला तर पोलीस लवकरात लवकर पोहोचू शकतील.
६. त्याचप्रमाणे टोलनाक्यांवर रुग्णवाहिका, अग्निशमन दल, टो-अवे क्रेनची व्यवस्था देखील सुनिश्चित केली जाते.
कोणाल टोल टॅक्समध्ये सूट मिळते:
• भारताचे राष्ट्रपती
• भारताचे पंतप्रधान
• भारताचे सरन्यायाधीश
• भारताचे उपराष्ट्रपती
• राज्याचे राज्यपाल
• केंद्रीय कॅबिनेट मंत्री
• सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
• लोकसभेचे अध्यक्ष
• केंद्रीय राज्यमंत्री ना
• केंद्रीय मुख्यमंत्री
• केंद्रशासित प्रदेशाचा लेफ्टनंट गव्हर्नर
• पूर्ण सामान्य किंवा समतुल्य पद धारण करणारे कर्मचारी प्रमुख
• एखाद्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष
• उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
• राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष
• उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
• भारत सरकारचे सचिव
• राज्य परिषद
• संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ
• संबंधित राज्यातील राज्य सरकारचे मुख्य सचिव
• एखाद्या राज्याच्या विधानसभेचा सदस्य
• राज्य दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर
इतर क्षेत्रे ज्यांना टोल टॅक्समधून सूट मिळते-
• संरक्षण मंत्रालय
• निमलष्करी दल आणि पोलिसांसह गणवेशातील केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दल
• अग्निशमन विभाग किंवा संस्था
• एक कार्यकारी दंडाधिकारी
• राष्ट्रीय महामार्गांची तपासणी, सर्वेक्षण, बांधकाम किंवा ऑपरेशन
• अपंगांसाठी यांत्रिक वाहने
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-