Voter ID Card Download | मतदार कार्ड आणि गावाची मतदार यादी डाउनलोड करा 2 मिनिटांत

Voter ID Card Download या प्रकारे स्व:ताचे कार्ड व गावाची मतदान कार्ड यादी डाउनलोड करा  :

•           तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर प्रथम तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये www.nvsp.in  टाइप करा आणि ओके क्लिक करा. आता तुमच्यासमोर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ओपन होईल.

सर्वप्रथम https://www.nvsp.in/ हि वेबसाईट ओपेन करा किंवा खाली क्लिक करा

voter card

•           आता डाव्या बाजूला एक शोध बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्याची URL http://electoralsearch.in ही असेल .

•           आता येथून तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव दोन प्रकारे तपासू शकता.

•           पहिल्या पद्धतीमध्ये प्रथम आपले नाव टाकावे.

•           नंतर  वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकावे.

•           नंतर आपले वय किंवा जन्म तारीख टाकावी.

•           नंतर आपले लिंग निवडा.

•           त्या नंतर  राज्य निवडावे.

•           त्या नंतर आपला जिल्हा निवडा.

•           विधानसभा मतदारसंघाचे नाव निवडा.

•           त्या नंतर शेवटी खाली दिलेल्या रकान्यात कॅपचा कोड टाकावा व सर्च या बटनावर क्लिक करावे. त्या नंतर तुमच्या समोर तुम्हाला तुमचे नाव मतदान यादीत आहे की ते दिसेल.

पुढे जाणून घ्या आणखी एक मार्ग :

सर्वप्रथम https://www.nvsp.in/ हि वेबसाईट ओपेन करा किंवा खाली क्लिक करा

voter card

•           यासाठी तुम्हाला त्याच पेजवर पर्याय मिळेल.

•           दुसरा मार्ग म्हणजे नावाने शोधण्याऐवजी मतदार ओळखपत्र क्रमांकाद्वारे शोधणे.

•           त्यासाठी प्रथम तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावे.

•           नंतर तुम्ही तुमचा राज्य निवडा.

•           त्या नंतर शेवटी खाली दिलेल्या रकान्यात कॅपचा कोड टाकावा व सर्च या बटनावर क्लिक करावे. त्या नंतर तुम्हाला तुमचे नाव मतदान यादीत आहे की ते दिसेल.

मतदार ओळखपत्राच्या मदतीने नाव शोधणे सोपे आहे.  कारण पूर्वीच्या पद्धतीत तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागते.

हे देखील वाचा